"...नाहीतर मला स्वतःला रस्त्यावर उतरायला लागेल" - छत्रपती संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

मुंबई - खासदार संभाजीराजे यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर जात मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक घेण्याचं आश्वासन संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या तरुणांना दिलंय.

आझाद मैदानावर मराठा तरुणांचा आंदोलनाचा आजचा ३६ वा दिवस आहे.  मराठा तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे. यापैकी कुणाचं काही बरंवाईट झाल्यास सरकार जबाबदार असेल, असं संभाजी राजे यांनी म्हटलंय. यातील आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्याने दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे.

मोठी बातमी - सामनातील संपादकीयमधल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात रश्मी वाहिनी...

दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर स्वतः रस्त्यावर उतरण्याचा इशाराही संभाजी राजेंनी दिलाय. "तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, या शब्दात संभाजीराजेंनी आंदोलक तरुणांना आश्वस्त केलंय. 

अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण काम पाहतायत.

अशोक चव्हाण स्वतः मराठा असूनही त्यांच्याकडून कामं होत नसल्याचा आरोप मराठा विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय.

संभाजीराजे यांच्यामार्फत संदेश देत अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलक तरुणांनी केलीये.

दरम्यान, सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे

मोठी बातमी  सावधान! करोना विषाणूृचा मुंबईत शिरकाव!

काय म्हणालेत संभाजीराजे ?

  • मी छत्रपतींचा वंशज म्हणून इथे आलोय, मी राजकीय उद्देशाने इथे आलो नाही  
  • 16 टक्के आरक्षणामधून ज्या 3 हजार 500 तरुणांना नोकरीसाठी कॉल आला. मात्र, त्यांना अद्याप काम मिळालं नाही. 
  • हे सरकार कोण चालवतंय, मुख्यमंत्री की अधिकारी?
  • मराठा तरुणांना न्याय कोणी द्यायचा? असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला.
  • मराठा समाजाच्या  शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याची जबाबदारी माझी असं देखील संभाजीराजे म्हणालेत.  

remove ashok chavan from the president post of the sub committee of maratha community

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove ashok chavan from the president post of the sub committee of maratha community