सामनातील संपादकीयमधल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात रश्मी वाहिनी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

मुंबई - रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक झाल्यात. संपादक झाल्यानंतर आजच्या पहिल्याच संपादकीयमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कडव्या शब्दात टीका करण्यात आलीये. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना 'दादामियां' असं संबोधण्यात आलंय.  

"दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचं  कितीही उकरुन काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्क लक्षात ठेवावं." याचसोबत अनेक मुद्यांवरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

मोठी बातमी - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकलेत, अजित पवारांनी मागितली माफी....
 
काय म्हणालेत चंद्रकांत पाटील? 

रश्मी ठाकरे या कर्तृत्ववान आहेत. रश्मी ठाकरेंकडून अश्या टीकेची अपेक्षा नव्हती.

प्रतिक्रिया आम्हाला देखील देता येते, मात्र कुणीही मर्यादा सोडून टीका करू नये.

रश्मी ठाकरे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्वीकारावं असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. 

ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं त्यानी मला सांगितलं होतं. आता सगळीच पदं ते घेत आहेत असं कसं असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान मी अग्रलेख लिहित नाही असं जर रश्मी ठाकरे म्हणत असतील तर संपादक का झालात असा प्रश्न उरतोच असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

मोठी बातमी - मोठी बातमी : मातोश्री परिसरातून पिस्तुलधारी इसमाला अटक !
 
अग्रलेखातले काही महत्वाचे मुद्दे: 

  • भाजपचे दादामियां 'इतिहास पुरुष' कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचं उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर २५ वर्षांआधी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर 'संभाजीनगर' केल्याचं त्यांच्या लक्षात यायला हवं होतं.
  • दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचं  कितीही उकरुन काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्क लक्षात ठेवावं.
  • जेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती तेव्हा असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते.  
  • देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ही मंडळी जे बोलतात आणि करतात त्यातून त्यांचं वैफल्य दिसून येतं. 
  • चंद्रकांत दादा जिथे नको तिथे जीभ टाळ्याला लावत आहेत त्यांची पावलं फडणवीसांच्या पावलावर पडत आहेत.
  • आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वंशज आहोत औरंग्याचे नाही त्यामुळे औरंगाबादचं नामांतर झालंच पाहिजे. 
  • भाजप सरकारनं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटही रचली नाही, सावरकरांना भारतरत्नही दिला नाही. 
  • अयोध्येत रामाचं मंदिरसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेनं उभं राहत आहे.
  • आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे. 

reaction of chandrakant patil after targeting in samana editorial
  
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of chandrakant patil after targeting in samana editorial