अखेर "लक्ष्मीबॉम्ब' चे नाव बदलले; आता "लक्ष्मी' नावाने प्रदर्शित होणार

संतोष भिंगार्डे
Thursday, 29 October 2020

हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. तुषार कपूर, शबीना खान या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या नावावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती.

मुंबई ः अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित "लक्ष्मीबॉम्ब' या चित्रपटाच्या नावाला होणाऱ्या विरोधावरून अखेर त्याचे नाव आता बदलण्यात आले आहे. आता "लक्ष्मी' या नावाने दिवाळीच्या धामधुमीत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवानी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे. 

५० टक्के शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे आदेश

"कंचन' या तमीळ चित्रपटाचा "लक्ष्मीबॉम्ब' हा चित्रपट रिमेक आहे. हा चित्रपट राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता आणि हिंदी चित्रपटही त्यांनीच दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. तुषार कपूर, शबीना खान या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या नावावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. आज हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे गेला. स्कीनिंग झाल्यानंतर दिग्दर्शक आणि सेन्सॉरचे सदस्य यांच्यामध्ये चर्चा होऊन अखेर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: renamed "Lakshmi Bomb"; now "Lakshmi" is shown