Maharashtra Politics | गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आमदार वाढले, जनतेचे प्रश्न मांडणारे कमी झाले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Bhavan
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आमदार वाढले, जनतेचे प्रश्न मांडणारे कमी झाले!

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आमदार वाढले, जनतेचे प्रश्न मांडणारे कमी झाले!

मुंबईतल्या आमदारांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या आधारावर त्यांचं रिपोर्ट कार्ड तयार कऱण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या आमदाराने बाजी मारली असून शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांनी शेवटून पहिला नंबर मिळवला आहे. प्रजा फाऊंडेशनकडून हे प्रगतीपुस्तक प्रसिद्ध कऱण्यात आलं आहे.

गुणांमध्ये काँग्रेस आमदार अमिन पटेल पहिल्या क्रमांकावर तर भाजपचे पराग अळवणी दुसऱ्या, आणि सेनेचे सुनील प्रभू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सेनेचे रवींद्र वायकर प्रकाश सुर्वे , भाजपचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांना सर्वात कमी गुण मिळाले आहेत. प्रजा फाउंडेशन कडून मुंबईतील आमदारांचा मागील दोन वर्षांत केलेल्या काम, विधानसभा सभागृहात मांडलेले प्रश्न यावर आधारित प्रगतीपुस्तक समोर आणला आहे.

हिवाळी अधिवेशन २०१९ ते पावसाळी अधिवेशन २०२१ या कालावधीत हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३१ आमदारांनी समोर आणलेल्या जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात हे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलं आहे. या अहवालातून पाच मंत्र्यांना वगळण्यात आलं आहे.

सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुंबईतील टॉप 5 आमदार

१)अमीन पटेल (काँग्रेस) - ८१.४३ %

२)पराग अळवणी (भाजप)- ७९.९६ %

३) सुनील प्रभू (शिवसेना) - ७७.१९ %

४) अमित साटम (भाजप) ७५.५७ %

५)अतुल भातखळकर (भाजप) - ७३.६१%

सर्वात कमी गुण प्राप्त करणारे मुंबईतील बॉटम ५ आमदार

१) रवींद्र वायकर (शिवसेना) -२८.५२ %

२)प्रकाश सुर्वे (शिवसेना)- २९.७६%

३)राहुल नार्वेकर (भाजप) -३१%

४)मंगल प्रभात लोढा - ३१.४९%

५)झिशान सिद्दीकी - ३२.५४%

२००९ -१० चं अधिवेशन आणि २०१९-२० च्या अधिवेशनाची तुलना केली तर २०१९-२० मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर विधानसभेच्या सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या मागील दहा वर्षांची तुलना केली तर ७४ टक्के कमी झाली आहे.

Web Title: Report Card Of Mumbai Mlas By Praja Foundation Congress Mla On Top

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..