सत्ता निरंकुश न होण्यासाठी माध्यमांनी सजग असावे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 July 2019

सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे, ही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीय पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.

मुंबई - सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे, ही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीय पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली. 

या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमणकाळ सुरू आहे. मुद्रित माध्यमांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्‍ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहिजेत. पुरस्काराचे मानकरी 

विविध पत्रकारिता पुरस्कार 
प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

वर्ष २०१६ चे पुरस्कार 
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - मारुती कंदले, प्रतिनिधी, दै. सकाळ-ॲग्रोवन, मुंबई नानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, दै. सकाळ, पुणे 

वर्ष २०१७ चे पुरस्कार 
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - लुमाकांत नलवडे, बातमीदार, दै. सकाळ, कोल्हापूर, नानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर, ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजित डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. सकाळ-ॲग्रोवन, सांगली. 

२०१८ चे पुरस्कार
पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार -  यमाजी मालकर , बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - हरी रामकृष्ण तुगावकर, दै. सकाळ, लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ-ॲग्रोवन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reporter Award Distribution Event