
Ghodbunder Traffic Jam
ESakal
ठाणे शहर : माजिवडा तर वर्सोवा चौक (फाउंटन) पर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हाती घेतलेले रस्ता रुंदीकरणाचे नियोजन फसलेले आहे. स्मार्ट ठाण्याची संकल्पनाच अधिकारी आणि लोक प्रतिनिधींनी खड्ड्यात घातली आहे. ठण्यात असा एकही रस्ता नाही, ज्यावर खड्डे पडलेले नाहीत. असा संताप व्यक्त करतानाच परिवहन मंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या भारतातील पहिल्या टेसला कारमधून स्वतःच्या मतदार संघात फेरफटका मारून दाखवावा, यामुळे त्यांनी घेतलेली देशातील पहिली कार कशी दिसते हे मतदारांना पाहता येईल आणि नवी कार खड्ड्यातून कशी चालते याचा देखील अनुभव घेता येईल, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रिपब्लिकन बहुजन सेनेने दिले आहे.