महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राज ठाकरे यांना हात जोडून विनंती

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राज ठाकरे यांना हात जोडून विनंती

मुंबई: मुंबई आंशिक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे नमुद करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्क वापरण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडून विनंती केली.

धार्मिक स्थळे, बाजारपेठा, लोकल यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री याबाबत पालिका प्रशासना सोबत चर्चा करुन निर्णय घेतील असेही महापौरांनी नमूद केले. राज ठाकरे मास्क वापरत नसल्याबद्दल महापौरांना विचारले असता त्या म्हणाल्या, " कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाचे आहेत. मी त्यांना हात जोडून विनंती करु शकते. आपल्या घरी आपल्या आई वयस्क आहेत. तुम्हाला अनेक जणं फॉलो करतात. तुम्ही अनेकांचे आयडॉल आहात. त्यामुळे काळजी घ्या अशी विनंती महापौरांनी केली.

वरळी परिसरात नियमांचे उल्लंघन करत शूटिंग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. अभिनेत्री दिशा पटनीचे शूटिंग असल्याची चर्चा आहे. याबद्दल महापौरांनी विचारल्यावर यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काय संबंध, वरळीच काय मुंबईत कोठेही नियमांचे उल्लंघन झाले तर प्रशासन कारवाई करेल. तुम्ही प्रशासनाकडे तक्रार करा असा सल्लाही महापौरांनी दिला.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Request from Mayor Kishori Pednekar wear mask to Raj Thackeray

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com