देशात पहिल्यांदाच ग्रामसभेत पर्यटन विकासासाठी ठराव! हेरिटेज तलावासाठी जामसरचा पुढाकार

देशात पहिल्यांदाच ग्रामसभेत पर्यटन विकासासाठी ठराव! हेरिटेज तलावासाठी जामसरचा पुढाकार

वसई ः पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यात असणारा जामसर तलाव जैवविविधता, सांस्कृतिक व ऐतिहासिक अशा तिहेरी संगमामुळे चर्चेत आला. ग्रामपंचायतीने हेरिटेज तलावाला टुरिझम घोषित करण्याचा ठराव केला आहे. देशाच्या नकाशात नोंद व्हावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, सरकार काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

तलाव सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे असून, साडेसहा हेक्‍टर जमिनीवर आहे. या ठिकाणी पाणथळ जागेत जैवविविधता आढळून आली आहे. यात चतुर पक्ष्याच्या ६० पेक्षा अधिक जाती, २०० हून जास्त वनस्पतींचे प्रकार तर कीटक आढळून आले. तीन पुरातन वास्तूही सापडल्या असून, आठव्या शतकातील असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सांस्कृतिक वारसा कसा होता, याचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे.पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणथळ जागेच्या अभ्यासासाठी सम्यंतक संस्थेची निवड केली. या ठिकाणी पुरातन मंदिर आहे. जागेवर अनेक बाबींचा उलगडा झाला. यासाठी पुरातत्त्व विभागाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेतली असता, उत्खननात पुरातन वास्तू समोर आल्या. २ फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन असून, या दिवशी पाणथळ संवर्धन व विकास यासाठी सरकारने पर्यटनस्थळ घोषणा केली तर ऐतिहासिक निर्णय होईल, असे सम्यंतकचे सदस्य सचिन देसाई यांनी सांगितले. गावात पुरातन मंदिराच्या जवळपास तलाव आहे. ज्या वेळी या ठिकाणी उत्खनन केले तेव्हा अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास समोर आला. अशा पुरातन वास्तू, पाणथळ जागा पाहता सरकारने पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठी मान्यता दिली तर या ठिकाणी सुवर्णमध्य साधता येईल, असे ग्रामस्थ राजेश तेंडुलकर यांनी सांगितले.

तीन वर्ष अभ्यास करण्यात आला. दोन वर्ष सर्व्हे केल्यावर अहवाल तयार करण्यात आला. तलावाच्या आजूबाजूला आढळलेल्या पुरातन अवशेषामुळे आदिवासी कला, संस्कृती आदींचा उलगडा होईल. 
 - समर्थ परब,
सभा पुरकर, पुरातत्त्व अभ्यासक

तलावाचे, पाणथळ जागेचे संवर्धन व्हावे म्हणून ग्रामस्थांनी सभेत ठराव मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. सरकारकडून मान्यता मिळाल्यास गावाचा विकास होईल. रोजगाराची संधी मिळेल.              
- विठ्ठल थेतले,
सरपंच, जामसर ग्रामधान

Resolution for tourism development in Gram Sabha for the first time in the country Jamsar initiative for Heritage Lake

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com