
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेदाचा विषय नाही.एकत्र बसले,तर मुद्दा निकाली निघेल. शिवसेनेची भुमिका कायम आहे.
मुंबई :औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेदाचा विषय नाही.एकत्र बसले,तर मुद्दा निकाली निघेल. शिवसेनेची भुमिका कायम आहे. असे नमुद करत पाच वर्ष भाजपची सत्ता होती.तेव्हा का हे सुचले नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत शिवसेना आणि कॉंग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडली आहे.त्यावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले,"महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांना औरंगजेबा पेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर श्रध्दा आहे आणि असायलाच हवी.जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसाच औरंगजेबही नाही.औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी 30 वर्षांपुर्वी केले आहे.आता फक्त कागदावरच बदलायचं आहे.असेही त्यांनी सांगितले.एका शहराच्या नावावरुन मतभेद वैगरे नसतात.असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराच्या प्रयत्नात शिवसेनेला मोठा झटका बसेल'; संजय निरुपम यांचा इशारा
शिवसेनेचे मुख्यमंत्री सामाना मधिल भाषे बद्दल संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीणार असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.त्यावर पत्रकारांनी विचाले असता"आता ते पत्र लिहीणार म्हणजे मी घाबरलो'अशा मिश्कील शैलीत उत्तर देत राऊत पुढे म्हणाले," ते आता सामना वाचायला लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे.कालपर्यंत ते सामना वाचत नव्हते.आता त्यांच्या जीवनात भरपुर बदल होतील.सामना वाचत राहीले तर त्यांचा विश्वास बसेल हे सरकार पुढील पाच वर्ष टिकेल.असा चिमटाही त्यांनी काढला.
resolve the issue of renaming Aurangabad from the discussion sanjay raut
--------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )