रायगड किल्ल्याच्या रोप-वे जमिनीचा वाद सामंजस्याने सोडवा; सुनिल तटकरेंचे आवाहन

सुनिल पाटकर
Monday, 5 October 2020

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रोप-वेचा प्रश्‍न सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. 

महाड : रायगड रोप-वेची जागा स्थानिक रहिवासी अवकीरकर यांच्या मालकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल; परंतु जागेचा वाद हा संघर्षातून सोडवण्याऐवजी सामंजस्यातून सोडवण्यावर भर देण्याचे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. 

'सुशांतप्रकरणी शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले'; शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया

तटकरे यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेत जिल्ह्यांतील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रोप-वेचा प्रश्‍न सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
जिल्ह्यांतील चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारने कर्ज न देता अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. पळस्पे ते चिपळूणपर्यंतच्या महामार्ग, म्हाप्रळ-पंढरपूर महामार्ग, ताम्हाणी घाट रस्ता, इंदापूर तळा, आगरदांडा रस्ता आदी रस्त्याचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

रेवस बंदरजेट्टी उत्तरेला दोनशे मीटर पुढे वाढवावी; प्रवासी संघटनांची मागणी

महाडमध्ये एनडीआरएफचे युनिट सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. लवकरच केद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर युनिट सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली. केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकामुळे देशांतील शेतकरी उद्‌ध्वस्त होणार आहे. भांडवलदारांसाठीच हे विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. 
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolve the ropeway land dispute of Raigad fort amicably Sunil Tatkares appeal