लॉकडाऊनमध्ये टपाल रेल्वे पार्सल सेवेला प्रतिसाद; दोन क्‍विंटलपर्यंतच्या वस्तू घरापर्यंत पोहचवणार

कुलदीप घायवट
Thursday, 21 January 2021

मोठ्या संख्येने लोक पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत

मुंबई, : मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल यांनी मिळून मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथे टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरू केली. लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेवर दहा टन वजनाच्या 27 हजार 965 टपाल पार्सलची वाहतूक आजवर करण्यात आली. 

लॉकडाऊन काळात व्यक्ती आणि व्यावसायिकांना मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणे कठीण जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. जादा वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल ऑफिस कार्यालयात नेणे अवघड आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे टपालामधील सामग्रीची वाहतूक करण्यात आली. मे 2020 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात ही वाहतूक करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. 
मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणाऱ्या विशेष पार्सल गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र टपाल सर्कलने मे 2020 पासून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ऑफर करून भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या क्षमता एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरुवातीला मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांत तसेच दरम्यान उपलब्ध झाली. त्यानंतर काही दिवसात कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथेही उपलब्ध करण्यात आली. भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेईल. मध्य रेल्वे व टपाल मेल मोटर सेवा द्वारे चालविल्या जाणाऱ्या खास पार्सल गाड्यांच्या माध्यमातून गंतव्य स्थानकावर वस्तू पोहचवले जात आहे. 

दोन क्‍विंटलपर्यंतच्या वस्तू घरापर्यंत 
मध्य रेल्वेच्या ट्विटर खात्यावरून भारतीय टपाल रेल्वे पार्सल बाबतची माहिती देत आहे. यात ग्राहकांना दोन क्विंटल वा त्याहून अधिक असलेल्या पार्सल वस्तू घरापर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. ग्राहकांच्या दारातून या वस्तू मध्य रेल्वे आणि टपाल सेवा घेऊन जाणार आहे, आवाहन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. 

Response to postal parcel service in lockdown Items up to two quintals will be home delivery

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to postal parcel service in lockdown Items up to two quintals will be home delivery