महिला विशेष लसीकरणाला मुंबईत प्रतिसाद

१ लाख ७ हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले.
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : वेगवान लसीकरणासाठी (Vaccination) मुंबई (Mumbai) महापालिका (Municipal) उपाययोजना राबवत आहे. त्यात मुंबईत (Mumbai) पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. तसेच महिलांचे (Womens) लसीकरणही (Vaccination) कमी झाल्याने महापालिकेने शुक्रवारी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १ लाख ७ हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले.

पालिकेला गुरुवारी रात्री २ लाख ७१ हजार कोव्हिशिल्ड डोस; तर ३५ हजार ५२० कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले. त्यामुळे फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला. त्यानुसार मुंबईतील सर्व सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सत्र भरवण्यात आले. या मोहिमेंतर्गत थेट लसीकरण केंद्रावर जाऊन महिलांना पहिला आणि दुसरा डोस घेण्याची मुभा दिली गेली होती.

Mumbai
मुंबईतील दहशतवाद्याचा आणखी एक कारनामा समोर; पाहा व्हिडिओ

फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाईन पूर्व नोंदणी आवश्यक करण्यात आली नव्हती. कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com