esakal | मोलकरणीशी शारीरिक लगट करायला गेला पण...
sakal

बोलून बातमी शोधा

मोलकरणीशी शारीरिक लगट करायला गेला पण...

घर कामाला येणाऱ्या मोलकरणीवर डोळा ठेवून घरी कुणी नसताना तीच्यासोबत लगट करणे एका सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याला अंगलट आले आहे.

मोलकरणीशी शारीरिक लगट करायला गेला पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : घर कामाला येणाऱ्या मोलकरणीवर डोळा ठेवून घरी कुणी नसताना तीच्यासोबत लगट करणे एका सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याला अंगलट आले आहे. मोलकरणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सेवानिवृत्त बॅंक अधिकारी भीमराव दाणी (68, सुभाष टेकडी परिसर, उल्हासनगर कॅम्प नंबर 4) यांच्या परिवारातील मंडळी बाहेरगावी गेल्यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय विवाहित मोलकरीण घरकाम करण्यासाठी आली होती. यावेळी दाणी याने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत, मोलकरणीला एकांतात गाठले व संधी साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी दाणी याने मोलकरणीशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला.

ही बातमी वाचा ः दाऊदचा बर्थडे डोंगरीत सेलिब्रेशन...

या अनपेक्षित प्रकाराने भयभीत झालेल्या मोलकरणीने तेथून पळ काढला. त्यानंतर घरी येऊन आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मोलकरणीने पतीसोबत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. फिर्यादी नुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमराव दाणी यांना अटक केली. पोलिसांनी दाणी याच्या घरातील सीसी टीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपीचे कृत्य उघडकीस आले आहे. 

loading image