विरार - सायबर भामट्यांचा लोकांना लुटण्याचा प्रकार सरास सुरु आहे असाच एक प्रकार वसईमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वसईतील वर्तक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. संतोष शेंडे यांना सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १ कोटी ३५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल असून अटक टाळण्यासाठी तडजोड म्हणून ही रक्कम उकळण्यात आली आहे.