अनंत चतुर्दशीपर्यंत 1401 बसगाड्यांचे आरक्षण, परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती

अनंत चतुर्दशीपर्यंत 1401 बसगाड्यांचे आरक्षण, परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती

मुंबई : कोकणातील गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बहुतांश मुंबईकर कोकणातून परतात. कोकणातून मुंबईत परतण्यासाठी एसटीला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. परतीच्या प्रवासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागातून 2 सप्टेंबरपर्यंतचे सुमारे 1 हजार 401 बसगाड्यांचे आगाऊ आरक्षण झाले असून त्यापैकी 458 बसगाड्यांचे गट आरक्षण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कोकणवासीयांनी यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे टाळले. त्यातही कोरोनाची चाचणी आणि जाचक नियम-अटींमुळे अनेकांनी मुंबईतच गणेशोत्सव करण्याचे ठरवले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दरवर्षीच्या तुलनेट घट झाली.

तरीही कोरोनामुळे एसटी बसमधून 50 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देत तीन हजार बसगाड्यांचे नियोजन केले होते. त्यामुळे मुंबईकरांची कोकणवारी सुखरूप झाली आहे. आता गणेशोत्सव आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासालाही एसटीलाच सर्वाधिक पसंती मिळत आहे.

कोकणातून मुंबईत परतण्यासाठी एसटीच्या तब्बल 1 हजार 401 बस आरक्षित केल्या आहे. त्यापैकी 458 बसगाड्यांचे अट आरक्षण करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

  • विभाग - गट - पूर्ण - अशंत पूर्ण - एकूण
  • रायगड - 162 - 38 - 138 - 338 
  • रत्नागिरी - 278 - 330 - 290 - 898 
  • सिंधुदुर्ग - 18 - 53 - 94 - 165 
  • एकूण - 458 - 421 - 522 - 1401

प्रत्यक्षात सुटलेल्या फेऱ्या 

रायगड विभागातून एक बस 23 ऑगस्टरोजी सोडण्यात आली आहे. तर 24 ऑगस्टरोजी रायगड 1, रत्नागिरी 4, सिंधुदूर्ग 5, अशा एकूण 10, 25 ऑगस्टरोजी रत्नागिरी 5, सिंधुदूर्ग 8, अशा एकूण 24 बसच्या फेऱ्या परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत सोडण्यात आल्या आहे.

for returning from konkan mumbikar prefers ST buses 1401 buses are already reserved

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com