काँग्रेस आमदारांनी पक्ष आदेश धुडकावला, बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

Balasaheb Thorat
Balasaheb Thoratesakal

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

त्यातच आता एकनाथ शिंदे कालपासून नॉट रिचेबल असल्याने सेनेच्या गोटातून मोठी बातमी येऊ शकते. भाजपला राज्यसभेवेळी १२३ मतं पडली होती. यंदा १३३ मतं पडल्याने मविआ सरकारची आणखी १० मतं फोडण्यात फडणवीसांना यश आलं आहे. मात्र सेनेची ११ मतं फुटल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. (Eknath Shinde News)

यासोबतच महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने 'ब्लेमगेम'ला सुरुवात झाली आहे. नाराजीनाट्य वाढल्याने काँग्रेसमधील उमेदवारांनी देखील क्रॉसवोटिंग केल्याचं स्पष्ट झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावल्याने आता जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसच्या गटनेता पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. (MLC Election 2022)

यंदा विधानपरिषदेसाठी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. यामध्ये भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात महत्वाची लढत होती. चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि भाई जगताप यांना लॉटरी लागली. दहाव्या जागेसाठी भाई जगताप यांचा विजय होणार की प्रसाद लाड विधानपरिषदेवर जाणार, अशी चर्चा होती. परंतू, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉसवोटिंग झालं.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भाजपला १२३ मतं मिळाली. मात्र यंदा विधानपरिषदेसाठी १३३ मतं मिळवत भाजपने मोठ्या प्रमाणात आमदार फोडले.

महाविकास आघाडी म्हणून पुन्हा विचार करावा लागेल - बाळासाहेब थोरात

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या आमदारांचीच काही मते आम्हाला मिळाली नाहीत, हे मान्य करावे लागेल. माझी भावना पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. या स्थितीत महाविकास आघाडी म्हणून देखील विचार करावा लागणार आहे.

सरकारला अडीच वर्षे झाली आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलं. या निकालामुळे नाराज झालेले महसूलमंत्री थोरात हे राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com