रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात मुंबई पोलिसात दाखल केली तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

रियाने सुशांतची बहीण प्रियांकासह इतर काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्जचे धागेदोरे मिळाल्यानं एनसीबीसुद्धा चौकशी करत आहे. यामध्ये रियाचा भाऊ शौविकसह दोघांना अटकही करण्यात आली आहे. आता रियाने सुशांतची बहीण प्रियांकासह इतर काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रियाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. 

रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर लोकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्याबद्दल तिने ही तक्रार दिली आहे. रियाने फसवणूक, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसिन प्रक्टिस गाइडलाइन्स 2020 अंतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. 

याबाबत रियाचे वकील सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जूनला सुशांत सिंह राजपूतला त्याची बहीण प्रियांका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं. त्यामध्ये अशा औषधांचा समावेश होता जी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे. 

हे वाचा - NCBनं समन्स बजावल्यावर रियानं कोणाला दिली धमकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea Chakraborty file complaint against sushant singh rajput sister