esakal | सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली, 'सॉरी बाबू'
sakal

बोलून बातमी शोधा

sushant rhea

मुंबई पोलिसांनी शवविच्छेदनाच्या आधी रियाला शवागारात प्रवेश कसा दिला याचं उत्तर द्यायला हवं. पुरावे नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही सुशांतच्या वडिलांच्या वकीलांनी म्हटलं.

सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली, 'सॉरी बाबू'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात दररजो नवे खुलासे होत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तपासात पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नुकतंच एका न्यूज पोर्टलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांच्या वकीलांनीही या मुद्द्यावरून प्रश्न विचारला आहे. 

एका न्यूज पोर्टलनं असा दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जिथं ठेवला होता त्या शवागारात रिया गेली होती. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात झालं होतं. रिया त्या रुग्णालयात तब्बल 45 मिनिटे होती असं सांगण्यात येत आहे. रियाला शवविच्छेदनाच्या आधी शवागारात जाण्याची परवानगी कशी मिळाली? जिथं सुशांतच्या कुटुंबियांनाही प्रवेश नव्हता. 

सुशांतच्या वडिलांच्या वकिलानेही हा प्रश्न उपस्थित केला आहे. रिया शवागारात गेली हे खूपच संशयास्पद आहे. त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी तिचं सुशांतशी कोणतंच नातं नव्हतं. मुंबई पोलिसांनी शवविच्छेदनाच्या आधी रियाला शवागारात प्रवेश कसा दिला याचं उत्तर द्यायला हवं. पुरावे नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही सुशांतच्या वडिलांच्या वकीलांनी म्हटलं.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ?

स्टिंग ऑपरेशनमध्ये शवागारातील अधिकारी सांगतो की, रियाला अनधिकृतपणे प्रवेश मिळाला होता. या कामात तिला मुंबई पोलिसांनी मदत केली होती. जर हे स्टिंग ऑपरेशन खरं निघालं तर रियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या तपासावरही बोट ठेवलं जाऊ शकतं. सुरजीत सिंह राठोरने रियाबाबत मोठा खुलासा केला आहे. कूपर रुग्णालयात सुशांतचा चेहरा पाहताच रिया सॉरी बाबू म्हटलं होतं असं वृत्त 'स्पॉटबॉय'नं दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी कोण कोण अधिकारी गेलेत, त्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावेळी घटनास्थळी काय काय पाहिलं, या आणि अशा अनेक विषयांवर CBI ची एक टीम मुंबई पोलिसांची चौकशी करत असल्याचंही समोर येतंय. शुक्रवारी साधारण दुपारी साडे बारा ते एक वाजेपासून CBI ची टीम मुंबई पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजतंय. 

loading image