रियाच्या जामीनावर आज सुनावणी; सुटकेसाठी भाऊ शौविकचाही अर्ज दाखल

अनिश पाटील
Thursday, 10 September 2020

अंमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने विशेष न्यायालयात बुधवारी जामीनासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी (ता. 10) यावर सुनावणी होणार आहे.

मुंबई : अंमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने विशेष न्यायालयात बुधवारी  जामीनासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी (ता. 10) यावर सुनावणी होणार आहे.

आमच्या प्रयत्नांवर पाणी फेरले; आघाडी सरकारवर फडणवीस यांची टीका

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रियाला अटक केली होती. सध्या ती भायखळा महिला कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपास यंत्रणांंना ती पूर्णपणे सहकार्य करीत असून तिच्यावर दाखल आरोप जामीनास पात्र आहेत, असे अर्जामध्ये म्हटले आहे. कोणत्याही प्रकारचे अमंलीपदार्थ रियाकडे सापडले नाही. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
अंमलीपदार्थ प्रकरणात अन्य अटक आरोपींनी तिचा उल्लेख केला आहे. सुशांतसाठी रियाने अंमलीपदार्थ मागविले होते, असा आरोप एनसीबीने तिच्यावर ठेवला आहे. याप्रकरणी ती निर्दोष असून तिला नाहक गुंतविण्यात आले आहे, असेही अर्जात म्हटले आहे. अॅड सतीश मानेशिंदे यांनी रियाच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला आहे.

कारवाई सुरूच! कंगनाच्या बंगल्यामधील बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आता खार येथील घरावर हातोडा?

शौविकला गुंतवण्यात आल्याचा आरोप 
अंमलीपदार्थ प्रकरणात रियाचा भाऊ शौविकही अटकेत आहे. याप्रकरणात त्यालाही गुंतविण्यात आल्याचा आरोप जामीन अर्जामध्ये करण्यात आला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर सीबीआय, एनसीबी आणि ईडी तपास करीत आहेत. मात्र, रियाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rheas bail hearing today; Brother Shauvik also filed an application for release