esakal | 'एम्स'च्या अहवालावर रियाच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया; सत्य उघड होईलच
sakal

बोलून बातमी शोधा

'एम्स'च्या अहवालावर रियाच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया; सत्य उघड होईलच

रिया विरोधात काही माध्यमातून जाणीवपूर्वक खोडसाळ वृत्त दिले जात आहे. पण आम्ही सत्यावर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे

'एम्स'च्या अहवालावर रियाच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया; सत्य उघड होईलच

sakal_logo
By
अनिश पाटील - सुनिता महामुणकर


मुंबई - कोणत्याही परिस्थितीत जे सत्य आहे ते उघड होईल, असा विश्वास आहे. एम्सच्या अहवालाची माहिती मिळाली आहे. तपासानंतर अहवाल न्यायालयात दाखल होईल. मात्र अजूनही रिया विरोधात काही माध्यमातून जाणीवपूर्वक खोडसाळ वृत्त दिले जात आहे. पण आम्ही सत्यावर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या नसुन, ही आमहत्या असल्याचा दावा एम्सच्या पथकाने केला आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी हत्येचा गुन्हा (भादंवि कलम 302) दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या सीबीआयने याप्रकरणावर स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.

तरुणांनो कोव्हिडला हलक्यात घेऊ नका! 40 वर्षाखालील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; तापाकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

सुशांत प्रकरणात  दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स)  डॉक्टरांच्या पथकाने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या शक्यतेला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असे या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ आणि इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले आहे.

 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असे स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटूंबियांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली असता, अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. मात्र, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारले आहे.

निश्‍चय केला, नंबर पहिला : सर्वोत्तम स्वच्छ शहरासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

 दरम्यान, या प्रकरणात अंमली पदार्थांच्या रॅकेटच्या बाजूनेही तपास करणाऱ्या एनसीबीला महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे  त्यामुळे रिया व तिचा भाऊ शौविक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. ड्रग्ज प्रकरणात रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली. तसेच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करण्यात आली आहे

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )