सुरक्षित अंतर ठेवत रिक्षा व्यवसाय सुरू करण्यास मुभा द्यावी; रिक्षाचालकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 May 2020

नवी मुंबई शहरातील रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे धाव घेत सुरक्षीत अंतर ठेवत रिक्षा व्यवसाय सुरू करण्यास मुभा द्यावी तसेच इतर ही प्रलंबित मागण्यांचे लेखी पत्र नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती कडून बुधवारी देण्यात आले.

तुर्भे : कोरोनामुळे लॉक डाऊन आणि संचारबंदीच्या परिस्थितीमुळे रिक्षाचे मीटर सध्या बंद असल्याने रिक्षा चालकांना कर्ज आणि उसनवारीवर उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे धाव घेत सुरक्षीत अंतर ठेवत रिक्षा व्यवसाय सुरू करण्यास मुभा द्यावी तसेच इतर ही प्रलंबित मागण्यांचे लेखी पत्र नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती कडून बुधवारी देण्यात आले.

...अन् मुलुंडचे वृध्दाश्रम हादरले! 21 जणांना कोरोनाची लागण

दोन महिन्यांपासून रिक्षा चालकांना आर्थिक समस्या सह इतर ही अडचीना सामोरे जावे लागत आहे. कोरोना' मुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्‍न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. शहरातील 12 हजार रिक्षा चालकांची जवळपास हीच परिस्थिती आहे.  उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे रोखीने जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील औषधोपचार यासाठी उसनवारी आणि कर्जाने घेतलेले पैसे संपत आले आहेत. त्यामुळे शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्प कर्जाच्या धर्तीवर विना अट त्वरित 25 हजार कर्ज द्यावे रिक्षाच्या कागदपत्र पूर्ततेसाठी किमान सहा महिन्यांचा अवधी द्यावा. रिक्षासाठी घेतलेलं कर्ज परतफेडीसाठी उपाय योजना कराव्यात, तसेच रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी त्वरित कल्याणकारी मंडळाची स्थपणा करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

अपयश झाकण्यासाठीच अधिकाऱ्यांचे बदलीसत्र : निरंजन डावखरे

भाड्याने रिक्षा चालवणारांची अवस्था वाईट
तसेच भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था तर त्याहून अधिकच वाईट आहे. स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक फारच कमी आहेत. बहुतांश रिक्षा चालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नविन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, सुट्या भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल-दुरुस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आहे. नुकतेच कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकाने आर्थिक व रिक्षाच्या बँक हप्त्याला वैतगुन आत्महत्या केली. 

 

शहरात जवळपास 12 हजारहून अधिक रिक्षा चालक आहेत. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. कर्जबाजारी होऊन तसेच उसनवारी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. मजुरांप्रमाणेच रिक्षा चालकांची परिस्थिती आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत आणि लॉक डाऊन नंतर त्यांना मदतीची गरज आहे.
- भरत नाईक, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw business should be allowed to start at a safe distance; The rickshaw driver approached the Chief Minister