रिक्षाचालक आणि पोलिसांमध्ये राडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

मारहाण करण्यात आलेली व्यक्ती मुबंई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील काही मुजोर रिक्षाचालकांनी शुक्रवारी (ता.31) एका व्यक्तीस जबर मारहाण केल्याची घटना घडली असून, मारहाण करण्यात आलेली व्यक्ती मुबंई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - गाईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी लाच

रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वाद होत असतात. यावेळी रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा प्रत्यय अनेकांना येत असतो. त्यातच अनेकदा रिक्षा चालकांमध्ये असलेल्या एकीमुळे ते सामान्य नागरिकांवर अरेरावी करत असतात.

या घटनेतील एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार संबधित व्यक्ती हा दुचाकीने जात असताना त्याच्यात आणि रिक्षाचालकात झालेल्या वादानंतर त्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. त्यानंतर लगेचच जवळच्या इतर रिक्षाचालकांनी तेथे येत दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. दरम्यान दुचाकीस्वाराने लगेचच कामोठे पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानक गाठत मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांना रेल्वे स्थानक परिसरातच चोप दिला. 

महत्त्वाची बातमी - रेशन कार्ड 'आधार' ला जोडा, अन्यथा...

घटनेनंतर संबधित व्यक्तीने व रिक्षाचालकांनी सामोपचाराने प्रकरण मिटवून घेतल्याने कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे

काही तास रिक्षा बंद. 

कामोठे पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी रिक्षा सेवा बंद ठेवत, कामोठे पोलीसठाण्या बाहेर गर्दी केल्याने खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा सेवा जवळपास 4 तास बंद ठेवण्यात आली होती. यामुळे सामान्यांची मात्र गैरसोय झाली होती.  

web title : rickshaw driver and police fight


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rickshaw driver and police fight