रिक्षाचालकाच्या मदतीने किशोरवयीन अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या रहस्याची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कुर्ला येथील एका नाल्यात सापडलेल्या एका किशोरवयीन अल्पवयीन मुलीच्या गूढ हत्येचा शोध घेण्यास एका ऑटोरिक्षा चालकाने मोलाची मदत पोलिसांना केली.

रिक्षाचालकाच्या मदतीने किशोरवयीन अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या रहस्याची उकल

मुंबई - कुर्ला येथील एका नाल्यात सापडलेल्या एका किशोरवयीन अल्पवयीन मुलीच्या गूढ हत्येचा शोध घेण्यास एका ऑटोरिक्षा चालकाने मोलाची मदत पोलिसांना केली. हत्येचं रहस्य उकलण्यात कारणीभूत ठरलेली पहिली माहिती, एका ऑटोरिक्षा चालकाकडून पोलिसांना मिळाली. या ऑटोरिक्षा चालकाने हत्येचा आरोप असलेल्या दोन महिलांना त्याच्या रिक्षातून नेले होते. या चालकाने केवळ माहिती पोलिसांना दिली नाही तर ज्या ठिकाणी महिलांनी रिक्षाचालकाला नेले पोलिसांना ते ठिकाण ही सांगितले. तसेच, आरोपी महीलांची ओळख पटवली. नेहरूनगर पोलिस त्या ऑटोरिक्षा चालकाचा सत्कार करण्याची शक्यता आहे. परंतु चालक या घटनेनंतर भयभीत झाल्याने त्याने पोलिसांना त्याची ओळख जाहीर करू नये अशी विनंती केली आहे.

5 ऑक्टोबर रोजी कुर्ल्यातील नाल्यात 16 वर्षीय मुलीचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला. हातपाय बांधून मृतदेह गोणीत गुंडाळलेला होता. या प्रकरणात नेहरूनगर पोलिसांनी कट आणि हत्येच्या आरोपात 3 महिलाना अटक केली आहे. तीन महीलांपैकी एक महिलेच्या पतीचे मृत महिलेशी असलेले विवाहबाह्य संबंध या कटाचे कारण बनले आहे. आरोपींनी कट रचून मृत महिलेचा 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास गळा आवळून तिला जीवे ठार मारले. नंतर शव गोणीत भरून रिक्षाने नेहरूनगर येथील नाल्यात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. तीनही महिला आरोपी महिलाना अटक करून पुढील तपास चालू आहे.