डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एका 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात (Tilaknagar Police Station) पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार, पोलिसांनी रिक्षाचालक फैजल खान (वय 21) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत तात्काळ बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेत अटक केली.