लोकल रेल्वे स्थानकावर रिक्षा सुसाट; व्हायरल होताच कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल रेल्वे स्थानकावर रिक्षा सुसाट; व्हायरल होताच कारवाई

लोकल रेल्वे स्थानकावर रिक्षा सुसाट; व्हायरल होताच कारवाई

मुंबई: दैनंदिन लोकल पकडण्याची धावपड करतांना नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असतांना, 12 आॅक्टोंबर रोजी प्रवाशांऐवजी रेल्वेच्या फलाटावर चक्क रिक्षा दिसून आली. प्रवाशांनी त्याचे व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर व्हायरल केले, त्यामूळे रेल्वेने तत्परतेने कारवाई तर केली, मात्र तिन्ही रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर अशी सारखीच परिस्थिती असल्याचे दिसून येत असून, कारवाईच होत नसल्याचे दिसून येत आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक १ वर कल्याणचा दिशेने रात्री १ वाजता अचानक एमएच ०२ सीटी २२४४ या क्रमांकाची रिक्षा आली होती. तेव्हा स्थानकांवर ट्रेनची प्रतीक्षा करणारे प्रवासी रिक्षा बघून चांगले गोंधळात पडले होते.

अनेकांनी रिक्षा बघून आरडाओरडा केली. काहीं प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. यादरम्यान प्रवाशांची आरडाओरड बघून घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले. त्यानंतर सुरक्षित रेल्वे स्थानकावरून ही रिक्षा सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल अटक करण्यात आली आहे.

तसेच पोलिसांनी रिक्षा सुद्धा जप्त केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतंही दुर्घटना झालेली नाही.मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

रेल्वे स्थानकांवरील जागृत प्रवाशांकडून जेव्हा एखादा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यानंतरच रेल्वे प्रशासनाने कारवाई करायची का ? असा प्रश्न आता कुर्ला येथील घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. इतर रेल्वे स्थानकांमध्ये सुद्धा प्रवाशांना पळवण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सींची स्पर्धा दिसून येत आहे. परिणामी प्रवाशांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र, त्यावर कारवाईच होत नसल्याने चिरीमीरीसाठी रेल्वे पोलीस रिक्षा,टॅक्सी चालकांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचेही सुत्रांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Mumbai railway