भाडेवाडीवरून रिक्षा-टॅक्सी युनियन बंदच्या पावित्र्यात

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

आम्ही भाडेवाढेचे निवेदन दिले आहे. त्यानुसार चार रूपये भाडेवाढीची मागणी आम्ही केली आहे. जर ती भाडेवाढ मिळाली नाही. तर आम्ही सर्व संघटनांना बसून ठरवू काय करायचं

- शशांक राव, अध्यक्ष, रिक्षा - टॅक्सी युनियन

मुंबई : तीन वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने भाडेवाडीवरून रिक्षा टॅक्सी युनियन बंदच्या पावित्र्यात आहेत. भाडेवाढ नाकारल्यास बंद पुकरण्यावरून रिक्षा - टॅक्सी युनियनमध्ये खलबते सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. तर गेल्या सहा महिन्यांत सीएनजीच्या दरात दोनदा वाढ झाली आहे. त्याचा फटका रिक्षा, टॅक्सी चालकांना बसत असल्याचे सांगत वाहतूक संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे.रिक्षाच्या पहिल्या दीड किमीसाठी दीड तर टॅक्सीच्या पहिल्या दीड किमीसाठी तीन रुपये भाडेवाढ करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिक्षा, टॅक्सी चालक संघटना आक्रमक असून त्यासाठी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

यामुळेच येत्या शुक्रवारी (ता.10) मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण व राज्य परिवहन विभागाची बैठक होणार आहे. या बैठकित भाडेवाढीचा निर्णय झाला नाही तर बंद पुकारण्यासाठी युनियनमध्ये खलबते सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यापूर्वीची भाडेवाढ

                ऑगस्ट 2014.           जून 2015
रिक्षा.        - 15 वरून 17,       17 वरून 18
टॅक्सी.       - 19 वरून 21,       21 वरून 22

Web Title: Rickshaw taxi union bandwidth go on Strike