
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : डोंबिवलीतील बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात वाचनालय उभारणीच्या कामावरुन शिवसेना ठाकरे गटाने - शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता भाजपाची देखील शिवसेना शिंदे गटाविरोधात असलेली नाराजी उघड झाली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांची समाज माध्यमावरील ही नाराजीची पोस्ट व्हायरल होत आहे. मतलबी आणि स्वार्थी मित्रपक्षाचा जाहीर निषेध करतो असे उघड उघड त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटल्याने डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे नाराजीनाट्य रंगताना दिसत आहे.