
-संकेत सबनीस
कल्याण : डोंबिवली-टिटवाळा अंतर १५ मिनिटांवर आणण्यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील अडथळे लवकरच दूर होणार आहेत. या टप्प्यांमधली काही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. तिथे एमएमआरडीएकडून कामदेखील सुरू केल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाने दिली.