Mumbai : ‘मनी लाँडरिंगमध्ये ऋषीकेश देशमुख सक्रिय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मनी लाँडरिंगमध्ये ऋषीकेश देशमुख सक्रिय’

‘मनी लाँडरिंगमध्ये ऋषीकेश देशमुख सक्रिय’

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश सक्रिय सहभागी होता. वडिलांनी गैरमार्गाने मिळवलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

देशमुख यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ऋषिकेशचा सक्रिय सहभाग आहे. मनी लाँडरिंगचा पैसा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखवण्यात ऋषिकेशने देशमुख यांना मार्गदर्शन केले, असा गंभीर आरोप ईडीच्या वतीने केला आहे. ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे ईडीने म्हटले आहे. ऋषिकेश तपासाला सहकार्य करत नाही, असा आरोप ईडीने केला

loading image
go to top