esakal | बेरोजगारीत वाढ ; ऑगस्टमध्ये १५.५० लाख गेल्या नोकऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बेरोजगारीत वाढ ; ऑगस्टमध्ये १५.५० लाख गेल्या नोकऱ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचा जीडीपी (JDP), जीएसटी (GST) संकलन तसेच शेअर बाजारातही (Share Market) मोठी वाढ झाल्याने अर्थकारणाचे चक्र पुन्हा गतिमान झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले होते; मात्र ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी (Unemployment) दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (Monitoring Indian Economy) (सीएमआयई) (CMIE) प्रसिद्ध केली आहे.

या आकडेवारीनूसार, ऑगस्टमध्ये तब्बल १५.५० लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे जीडीपी वाढत असला, तरी ऐन कोरोनाकाळात मध्यमवर्गीयांच्या खरेदीक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.९५ टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात १.३७ टक्क्यांनी वाढ होऊन हा दर आता ८.३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यातही शहरी बेराजगारीचे प्रमाण जुलैमध्ये ८.३ टक्के होते; ऑगस्टमध्ये हा दर तब्बल ९.७८ टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचा: भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष;पाहा व्हिडिओ

ग्रामीण भागाला फटका

देशातील शहरांमध्ये जुलैमध्ये औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रात जवळपास ३९.९३ कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. ऑगस्टमध्ये ही संख्या ३९.७७ कोटीपर्यंत आली; तर ग्रामीण भागात १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

loading image
go to top