
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील शीतगृहात अमोनिया वायूची गळती झाल्याची घटना शनिवारी घडली. शीतगृहांमध्ये वारंवार अशा घटना घडतात. अशात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास बचावासाठी रहिवाशांसह शीतगृहात काम करणाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील आजूबाजूच्या गावातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्वाची बातमी : गॅसवाहिनीच्या परिसरात राहणे घातकच : न्यायालय
तळोजा औद्योगिक परिसरात खेरणे, डोंगऱ्याचा पाडा, देवीचा पाडा परिसरात मासळी स्वच्छ करून ती पाकिटात बंद केली जाते. मासळी ताजी ठेवण्यासाठी येथे शीतगृहे बांधण्यात आली आहेत. या शीतगृहामध्ये बर्फ बनविण्यासाठी व या विभागातील वातावरण थंड ठेवण्यासाठी अमोनिया वायूचा उपयोग केला जातो.
अमोनिया वायूची गळती झाल्यास येथे अनेकांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे शीतगृहामध्ये अमोनिया वायूचा वापर करताना वायुगळती झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती शीतगृहात काम करणारे कामगार व आजूबाजूला रहिवाशांना देणे बंधनकारक आहे. मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीमधील शीतगृहमालकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोठी बातमी : कोरेगाव - भिमा चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ
वायुगळतीचा प्रकार घडल्यास हवेच्या विरुद्ध दिशेला जायचे, असे संकेत असताना ग्रामस्थ मात्र गळती होणाऱ्या कारखान्याभोवती गर्दी करतात. त्यामुळे भविष्यात या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तळोजा औद्योगिक परिसरात अनेक कारखान्यांमध्ये अमोनियाचा वापर केला जात असल्याने, वायुगळती झाल्यास काय करावे, याचे अनेकदा प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती तळोजा मॅनिफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी दिली आहे.
यापूर्वीच्या घटना
23 नोव्हेंबर 2010
प्लॉट क्रमांक एम 5 येथील रफिक नायक फिश पॅकेजिंग कंपनीत अमोनिया वायूची गळती झाली. हा वायू हवेवाटे कंपनीलगतच्या ढोंगऱ्याचा पाडा गावात पसरला. परिसरातील झाडे अक्षरशः जळून गेली. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डोळ्यांतून पाणी येऊ लागले. काही जण जागीच बेशुद्ध पडले. सुमारे 70 ग्रामस्थांना या वायूची बाधा झाली. ग्रामस्थांना कामोठे येथील एमजीएम, वाशीतील एमजीएम व जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
28 एप्रिल 2018
दीपक फर्टीलायझर कंपनीत झालेल्या गॅसगळतीमध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला होता.
2018
नाईक ओसीयार कंपनीत अमोनिया वायुगळती झाली. त्यामध्ये सात जणांना बाधा झाली होती.
12 फेब्रुवारी 2019
प्लॉट क्रमाक एम 5 येथे रफिक नाईक मच्छी कंपनीत मोठ्या प्रमाणात वायुगळती. वायुगळतीमुळे ढोंगऱ्याचा पाडा गावातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला होता. वायुगळतीमुळे कंपनीतील सहा कामगारांना श्वसनाला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना देवीचा पाडा येथील जीवनज्योती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
14 जून 2019
डब्ल्यू 216 या भूखंडावरील केमिकल कंपनीला आग लागली. येथील वायूमुळे आग गटारात पोहोचली. त्यामुळे इतर कंपन्यांना धोका निर्माण झाला होता.
.
अमोनिया वायू म्हणजे काय?
अमोनिया हा तीव्र वासाचा रंगहीन वायू असून युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम फास्फेट, अमोनियम नायट्रेट आदी रसायनांचा उपयोग केला जातो.
हे आहेत धोके
अमोनियांचा जास्त संपर्क आल्यास मृत्यू होऊ शकतो. हवेतील अमोनियाच्या उच्च सांर्द्रतेमुळे नाक, घसा आणि श्वसनमार्गात जळजळ होते. त्वचेची जळजळ होणे, डोळ्यास कायमस्वरूपी नुकसान होणे किंवा अंधत्व यासह अन्य दुखापत होऊ शकते.
ही घ्यावी खबरदारी
कोणत्याही उद्योगातून किंवा अमोनियाच्या टाकीमधून अमोनिया वायूची गळती झाल्यास, वातावरणात अचानक अमोनिया पसरला तर डोळे व चेहरा पुरेसा पाण्याने धुवावा. अमोनिया पाण्यात खूप विषद्रव्य आहे. त्यामुळे पाण्याने चेहरा धुवून ते विरघळते.
शीतगृह चालकांचे असहकार्य
गळतीची माहिती देण्यास शीतगृह चालकांकडून नेहमीच टाळाटाळ केली जाते. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतर शीतगृहात चौकशी केल्यानंतर गळती झालेल्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी गळतीची आणि त्यानंतर केलेल्या दुरुस्तीची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांना दिली. अग्निशमन विभागाचे अधिकारी दीपक दोरुगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेप्रसंगी शीतगृह चालक अग्निशमन अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसून सुरक्षा रक्षकाला पुढे करून अग्निशमन दलाच्या जवानांना प्रवेशद्वाराबाहेर रोखण्याचे गंभीर प्रकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गळतीचा प्रकार किरकोळ असला तरी जास्त वेळ वायूचा विसर्ग झाल्याने ग्रामस्थांना त्रास जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे घटनास्थळावर जाऊन गळती बंद झाल्याची खात्री केली.
- दीपक दोरुगडे, अग्निशमन अधिकारी, तळोजा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.