मोठी बातमी - कोरेगाव-भिमा चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

मुंबई : कोरेगाव-भिमा चौकशी आयोगाला निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरू असून, दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या संदर्भात गृह विभागाने शनिवारी (ता. 1) आदेश जारी केला आहे. 

मुंबई : कोरेगाव-भिमा चौकशी आयोगाला निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरू असून, दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या संदर्भात गृह विभागाने शनिवारी (ता. 1) आदेश जारी केला आहे. 

शनिवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने महसूल आणि गृह विभागाने हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेसंदर्भातील चौकशीसाठी राज्य शासनाने न्या. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व सेवा निवृत्त मुख्य सचिव सुमित मल्लिक हे सदस्य असलेला चौकशी समिती आयोग गठीत केला आहे. या आयोगास आत्तापर्यंत पाच वेळा मुदतवाढ शासनाने मंजूर केली. आयोगास सन 2018-19 या वर्षांसाठी 1 कोटी 4 लाख रुपये सन 2019-20 वर्षांसाठी 65 लाख रुपये इतकी रक्कम उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

मोठी बातमी - व्हॅलेन्टाईन्स-डे साठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

कोणत्याही कार्यालयासाठी निधीची तरतूद करताना संबंधित कार्यालयाने केलेली मागणी विचारात घेऊन आवश्‍यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. आयोगास सन 2019-20 या वर्षी दिलेली मुदतवाढ विचारात घेता आयोगाच्या विनंतीनुसार अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे. आयोगास आवश्‍यक असलेला निधी पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरू आहे व त्यास काही कालावधी लागणार आहे. 

गृह विभागाच्या इतर शिर्षकाखाली बचतीच्या रक्कमेतून आयोगास तातडीने लागणारी रक्कम उपलब्ध करुन देता येईल किंवा कसे या बाबतची कार्यवाही समांतररित्या सुरु होती. त्या व्दारे आयोगास 20 लाख रुपये इतका निधी पुनर्विनियोजनाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे व ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणण्यात आली होती. आयोगाने वेळोवेळी निदर्शनास आणलेल्या अडचणी शासनाच्या गृह विभागामार्फत दूर करुन त्याचे निराकरण करण्यात आले. आयोगास राज्य शासन नेहमीच सहकार्य करीत असून आयोगास या पुढेही त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक सहकार्य करेल, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. 

मोठी बातमी -  शरद पवार म्हणतात 'हे जेवण आयुष्यभर लक्षात राहील'

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासाठी मदत आणि पाठपुरावा करून तातडीने निर्णय करून घेतल्याबद्दल थोरात साहेब आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन व आभार!

- डॉ. संजय लाखेपाटील - पक्षकार 

inquiry committee of koregaon bhima gets twom moths extension maharashtra government clears dues


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inquiry committee of koregaon bhima gets twom moths extension