esakal | रिया चक्रवतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; एनसीबीकडून सुरू होती चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

रिया चक्रवतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; एनसीबीकडून सुरू होती चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आज अटक केली.

रिया चक्रवतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; एनसीबीकडून सुरू होती चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आज अटक केली. मंगळवारी तिसऱ्यांदा रियाची चौकशी केल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचा दावा करणाऱ्या रियाने अखेर चौकशीदरम्यान ड्रग्ज सेवनाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रियाची अटक ही सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नाही तर ड्रग्ज प्रकरणी झाली आहे. एनसीबी सुशांतच्या प्रकरणात ड्रग्जच्या संदर्भात तपास करत आहे.

ड्रग्जसाठी रिया शौविकला सूचना करत होती. त्यानुसार अब्दुल आणि जैदच्या संपर्कात राहून शौविक अमली पदार्थ मिळवत. त्यानंतर ते सॅम्युअल मिरांडाकडे देत असे. त्यानंतर रियाच्या सांगण्यावरून दीपेश ते ड्रग्ज घेऊन येत असल्याची कबुली रियाने दिल्याची माहिती आहे. अमली पदार्थांच्या सेवनावरून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांत सावंत या तिघांच्या अटकेनंतर रियाभोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला होता. मंगळवारी चौकशीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर रियाच्या अटकेच्या प्रक्रियेला ‘एनसीबी’ने सुरुवात केली.