रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

पूजा विचारे
Friday, 11 September 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर न्यायालयानं निकाल दिला आहे.  रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. रियासह शौविक आणि पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर न्यायालयानं निकाल दिला आहे.  रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. रियासह शौविक आणि पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तिच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयानं आजच्यासाठी निकाल राखून ठेवला होता.

ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयानं रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयानं सर्व ६ आरोपींची जामीन याचिका फेटाळली आहे.  रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांच्यासह सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची जामीन याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे.

एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली कि त्याचा अभ्यास करून पुढच्या आठवड्यात उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करणार, असे रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. 

गुरुवारी जामीन अर्जावरील सर्व युक्तीवाद पूर्ण झाले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने आपला निर्णय सुनावत रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्र आणि अब्दुल बासित परिहार यांनाही जामीन मंजूर केला नाही. याआधीही रियानं जामीनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयानं तिचा जामीन अर्ज फेटाळला. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी कोर्टानं २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला. ज्याचा निर्णय दिला आहे.  एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक केली. मॅजिस्ट्रेट न्यायालयानं तिची जामीन याचिका आधीच फेटाळली आहे.

विशेष न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी गुरुवारी चक्रवर्ती भाऊ बहिण आणि विशेष सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीशांनी या प्रकरणातील अन्य चार आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने खटला शुक्रवारपर्यंत तहकूब केला होता. यावर आज सुनावणी करत सर्व आरोपींचा जामीन नाकारण्यात आला. ही याचिका रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दाखल केली होती.

Riya Chakraborty's bail application rejected by court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riya Chakraborty's bail application rejected by court