NCBच्या जबाबात रिया चक्रवतीचे खळबळजनक विधान; सारा अली खानने सुशांतसोबत हेवी डोस घेतल्याचा खुलासा

युगंधर ताजणे
Monday, 21 September 2020

नारकोटिक्स ब्युरोने केलेल्या चौकशीत आता सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची एनसीबीच्या टीमकडून चौकशी करण्यात येणार आहे

मुंबई  - नारकोटिक्स ब्युरोने केलेल्या चौकशीत आता सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची एनसीबीच्या टीमकडून चौकशी करण्यात येणार आहे. सुशांतने सर्वात आधी सारा अली खानसोबत ड्रग्जचा हेवी डोस घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा रियाने केला आहे. एनसीबीच्या तपासातुन आणखी कुठल्या बाबी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

मराठा आरक्षणात केंद्राने व भाजपने कुंपणावर बसू नये; विरोधकांच्या भूमिकेत राजकारणाचा वास असल्याची अरविंद सावंत यांची टीका

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल सीबीआयमध्ये सुरू असलेला तपास आता निर्णायक टप्प्यावर आहे. दुसरीकडे, रियाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. अटक करण्यापूर्वी तिची तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. यात रियाने सुशांतचं घर सोडण्याचं खरं कारणही सांगितलं. तिच्या कबुली नाम्यात बंद्यात रिया म्हणाली की, सुशांत एक व्यसनाधीन माणूस होता आणि कितीही वाटून ती त्याला त्यातून बाहेर काढू शकत नाही. रिया म्हणाली की सुशांत लवकर घाबरायचा. जेव्हा त्याच्यावर मीटू संदर्भातले खोटे आरोप लावण्यात आले तेव्हाही तो घाबरला होता. आपलं करिअर संपेल अशी भीती त्याला सतत वाटायची.

सुशांत क्युरेटडेट मारुआना म्हणजेच गांजाचे १० ते २० डोप्स घ्यायचा. संजना संघीने त्याच्यावर  मीटूचा आरोप केल्याचं समजताच तो चिंताग्रस्त झाला होता. याच काळात त्यांचं ड्रग्ज घ्यायचं प्रमाण वाढलं. लॉकडाऊनमध्येही अंमली पदार्थांचे सेवन वाढले होते. 

'मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय'; चंद्रकांत पाटील यांचा सरकारवर घणाघात

रिया म्हणाली,'केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुशांतला अमली पदार्थांचं सेवन करण्याची तलफ वाढत गेली. या सिनेमाच्याआधीही तो ड्रग्ज घ्यायचा. ते प्रमाण मर्यादित होतं. पण केदारनाथच्या काळात त्यांचं अमली पदार्थांचं सेवन करणं वाढलं. तिथे ड्रग्ज सहज आणि मुक्तपणे उपलब्ध असल्याने 'केदारनाथ' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांत हिमालयात थांबला होता. संपूर्ण सेटवर ड्रग्ज घेतले जायचे. रियाने सांगितल्यानुसार, गांजामुळे खूप भूक लागते आणि वजन वाढतं. 'केदारनाथ'च्या शूटिंगमधून परत आल्यावर सारा अली खान आणि सुशांत दोघांचंही वजन वाढलं होतं.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riya Chakrabortys sensational statement in response to NCB

टॉपिकस