esakal | 'मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय'; चंद्रकांत पाटील यांचा सरकारवर घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय'; चंद्रकांत पाटील यांचा सरकारवर घणाघात

भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

'मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय'; चंद्रकांत पाटील यांचा सरकारवर घणाघात

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला आहे. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजातील काही बड्या नेत्यांनाच मराठा आरक्षण नको आहे. असं माझं पुर्वीपासून म्हणणं आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने 15 वर्षे संपुर्ण बहुमताचे सरकार असताना मराठ्यांना आरक्षण देऊ केले नाही. समाजाचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडवावेत असे राज्यातील महाविकास आघाडील अजिबात वाटत नाही. कोणत्याही मार्गांने मराठा आंदोलनं दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूरमध्ये येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण! सारा, रकुल, सिमोन यांना समन्स पाठवणार; अंमली पदार्थ विरोधी पथकाने फास आवळला

1999 ते 1014 पर्यंत मराठा समाजाकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या सरकारने दूर्लक्ष केलं. धनदांडग्यांकडे फक्त लक्ष दिलं, गरिब मराठा माणसाची परिस्थिती याच सरकारमुळे अधिक बिकट झाली. भाजप सरकारने जे प्रामाणिकपणे समाजाच्या प्रश्वांकडे लक्ष दिले. आरक्षणही न्यायालयात टिकवून दाखवले. परंतु या महाविकास आघाडी सरकाने ते घालवले. अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली

loading image