

Dombivli Ro-Ro Service
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर प्रारंभ झाला असून, या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.