ठाण्यातील रस्ते होणार अधिक चकचकीत! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण त्यानंतरही शहराचे नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत असल्याने रस्त्यांचा अधिक विकास करणे ही काळाची गरज ठरली आहे. अशावेळी महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने आता पुढील काळात शहरातील सर्व रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शिवसेनेने पावले टाकली आहेत. मुख्यमंत्री शहर सडक योजना शहरात राबविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ठाणे : शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण त्यानंतरही शहराचे नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत असल्याने रस्त्यांचा अधिक विकास करणे ही काळाची गरज ठरली आहे. अशावेळी महापालिकेत आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने आता पुढील काळात शहरातील सर्व रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शिवसेनेने पावले टाकली आहेत. मुख्यमंत्री शहर सडक योजना शहरात राबविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कर्नाटकच्या तिरंग्याचा मुंबईत बोलबाला

मुख्यमंत्री शहर सडक योजना ठाण्यातही लागू होण्यासाठी शहरातील रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो सरकारकडे सादर करावा, अशा आशयाची प्रस्ताव सूचना स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी आगामी सर्वसधारण सभेत सादर केली आहे. प्रचंड वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे.

दीडनंतर पेग बनवाल तर परवाना गमवाल 

लोकसंख्येच्या मानाने शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. तरीही रस्त्यांची अवस्था फारशी चांगली दिसत नाही. रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी देखील पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. याच पार्श्‍वभूमीवर शहरात "मुंख्यमंत्री शहर सडक योजना' राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, त्याअंतर्गत ठाणेकरांना चकाचक रस्ते मिळण्याची अपेक्षा आहे. 

पहिल्या लाभार्थीचा मान! 

  • राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने रस्त्यांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध होण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी येत्या महासभेत प्रस्तावाची सूचना मांडली आहे. राज्य सरकारने शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने "मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'च्या धर्तीवर "मुख्यमंत्री शहर सडक योजना' राबविण्याचे निश्‍चित केले आहे.
  • त्यानुसार या योजनेचा पहिला लाभार्थी ठाणे शहर व्हावे यासाठी ही सूचना मांडल्याचे रेपाळे यांनी सांगितले. त्यानुसार पालिका हद्दीतील रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून या रस्त्यांच्या कामांसाठी आर्थिक तरतूद करून देण्यासाठी हा अहवाल सरकारकडे पाठविण्यात यावी, अशी सूचना रेपाळे यांनी केली आहे. 

शहरातील रस्त्यांचे जाळे

  • सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात आजच्या घडीला तब्बल 21 लाख 38 हजार 67 वाहने आहेत. सद्यस्थितीत शहरातील काही मोजक्‍याच रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. तर काही रस्त्यांची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. 
  • शहरातील एकूण रस्त्यांची लांबी पूर्वी 356 किमी होती, ती गेल्या एका वर्षात 2018-19 मध्ये वाढून 370 किमी एवढी झाली आहे. शहरात एकूण 14 प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांचे क्षेत्रफळ 31 हेक्‍टर एवढे आहे. 
  • महापालिकेने जुन्या ठाण्यातील सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जुन्या ठाण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासही मदत होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads in Thane will be more dazzling!