... बनावट मास्क विक्रीतून नागरिकांची लूट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

राज्यातील कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन पदपथ, भेळपुरी दुकाने आणि किराणा दुकानांत बनावट मास्कची विक्री सुरू आहे. पुरेशी माहिती नसल्यामुळे नागरिक बनावट मास्क खरेदी करत आहेत. 

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन पदपथ, भेळपुरी दुकाने आणि किराणा दुकानांत बनावट मास्कची विक्री सुरू आहे. पुरेशी माहिती नसल्यामुळे नागरिक बनावट मास्क खरेदी करत आहेत. 

ही बातमी वाचली का? मुंबईच्या ...'या' भागात सुरू झालीये रो-रो सेवा

आवश्‍यकता नसल्यास मास्क वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केले होते. त्यानंतरही पदपथांवर बनावट मास्कची विक्री सर्रास सुरू आहे. त्यातच भेळपुरीवाले आणि किराणा दुकानांतही २० रुपयांपासून ३५ रुपयांपर्यंत मास्क विकले जात आहेत. वडाळा व अन्य रेल्वेस्थानके, एसटी स्थानके, बाजार, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर मास्कची विक्री सुरू असल्याचे दिसते. अनेक भागांत छोटी दुकाने आणि पदपथांवरही विक्रीसाठी मास्क मांडून ठेवल्याचे आढळते. नागरिकांमधील भीतीचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक आणि लूटमार सुरू आहे. 

ही बातमी वाचली का? कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस? 

कृत्रिम तुटवडा
स्वस्त दरात मिळणाऱ्या मास्कची किंमत वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मास्कचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. सामान्य नागरिक ते खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

बनावट मास्कची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क न विकण्याचे निर्देश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- डी. आर. गहाने, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... Robbery of citizens by selling fake masks!