घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत घातला दरोडा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

कुत्र्यांना दरोडेखोरांनी विष घालून ठार करत बंगल्याचा मागचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.

डहाणू - चिंचणी जवळच्या बावडा गावातील प्रतिष्ठित नागरिक रोहिंटन तारापोरवाला यांच्या बंगल्यात पाच अज्ञात दरोडेखोरांनी शनिवारी (ता.22) मध्यरात्रीच्या सुमारास मागील दाराने प्रवेश करून बंदूक, चाकू आणि लोखंडी सळ्यांचा धाक दाखवून रोख रक्कम, दागिने व घरातील इतर वस्तू असा एकूण सहा लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. याबाबत वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या चोरट्यांचा तपास करीत आहेत. 

हेही वाचा - जवळचे भाडे नकोच

शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बंगल्यातील कुत्र्यांना दरोडेखोरांनी विष घालून ठार करत बंगल्याचा मागचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर रोहिंटन तारापोरवाला आणि त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करत घरातील रोख रक्कम, दागदागिने व इतर वस्तू असा एकूण सहा लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटला.

महत्त्वाची बातमी - मनसे आमदार राजू पाटलांचा सरकार गंभीर आरोप

याबाबत वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाला पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी भेट देत पाहणी केली. त्यांनी दरोडेखोरांचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना वाणगाव सहायक पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांना दिल्या आहेत. 

नियोजित दरोडा 

या दरोड्यात दरोडेखोरांनी संपूर्ण नियोजन केले असल्याचे दिसून आले. सर्वात आधी बंगल्यातील कुत्र्यांना विष घालून ठार केले. त्यानंतर मागच्या दरवाजाची आधीपासूनच माहिती घेऊन ठेवली होती. तेथूनच प्रवेश केला. तसेच बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या ताराही कापून टाकल्या होत्या. 

web title : A robbery in the house threatens a gun


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A robbery in the house threatens a gun