मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर केला 'हा' गंभीर आरोप 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मागील काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसर हा तेथील गुलाबी रस्ता, भीषण आग इत्यादींमुळे चर्चेत आला आहे.

मुंबई - मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आपल्या तडफदार भूमिका आणि घणाघाती टिकांसाठी कायम चर्चेत असतात.यंदाच्या विधानसभेत मनसेला खास काही यश प्राप्त झाले नसले तरी आपल्या नव्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे मनसे पुन्हा एकदाचर्चेत आली आहे. त्यातच डोंबिवली येथे निवडून आलेल्या मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांनी ठाकरे सरकारवर डोंबिवली एमआयडीसीतील प्रकारांबाबत गंभीर आरोप केले आहेत. 

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहिर

मागील काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसर हा तेथील गुलाबी रस्ता, भीषण आग इत्यादींमुळे चर्चेत आला आहे. त्यातच तेथे सुरु असलेल्या गटारांच्या कामादरम्यान एक संरक्षक भिंत पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारवरच टिका केली आहे. त्यांनी एमआयडीसी आणि कल्याण डोंबिवली महापालिका हे म्हणजे भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे, असेच थेट म्हटले आहे. एमआयडीसीत गटारांची सध्या सुमारे 29 कोटींची कामे चालू आहेत. याच एका कामांदरम्यान काल एक संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. यावर बोलताना आमदार राजू पाटील यांनी हि टिका केली. 

महत्त्वाची बातमी - चीनहून परतली, अन् कोरोना घेऊन आली

काय म्हणाले राजू पाटील 

एमआयडीसी आणि कल्याण डोंबिवली महापालिका हे भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे. या ठिकाणी कामे करण्यासाठी कत्रांटदारच जागेवर नाहीत. येथील कामांचे श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी केली पण टेंडर मात्र पालिका काढत नाही. अशा प्रकारची टिका राजू पाटील यांनी केली.  

web title : MNS MLA Raju Patil has made a serious allegation against the government

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS MLA Raju Patil has made a serious allegation against the government