esakal | वरळीतील 'एनएससीआय'मधील रोबोट आता रुग्णसेवेतही दाखल; तापमान, ऑक्सिजन पातळीही तपासणार
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीतील 'एनएससीआय'मधील रोबोट आता रुग्णसेवेतही दाखल; तापमान, ऑक्सिजन पातळीही तपासणार

वरळीतील एनएससीआय या कोव्हिड सेंटरमध्येही 'रोबोट 2.0' दाखल झाला आहे. रुग्णांपर्यंत अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्यासोबतच हा रोबोट रुग्णांचे पल्स ऑक्सीमीटरही चेक करणार आहे.

वरळीतील 'एनएससीआय'मधील रोबोट आता रुग्णसेवेतही दाखल; तापमान, ऑक्सिजन पातळीही तपासणार

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड


मुंबई : वरळीतील एनएससीआय या कोव्हिड सेंटरमध्येही 'रोबोट 2.0' दाखल झाला आहे. रुग्णांपर्यंत अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्यासोबतच हा रोबोट रुग्णांचे पल्स ऑक्सीमीटरही चेक करणार आहे.  त्यामुळे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने त्यांची जोखीम कमी होणार आहे.

एसटीच्या आंतरजिल्हा सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; लांब पल्ल्याच्या सेवाही लवकरच सुरू होणार

रोबोट 2.0 मध्ये सेन्सर बसवण्यात आला असून त्याआधारे तो रुग्णाच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी आणि ईसीजी करणार आहे. विशेष म्हणजे रोबोटद्वारे डाॅक्टर्स रुग्णांशी संवादही साधू शकणार आहेत. त्यामुळे, डाॅक्टरांचीही जोखीम कमी होणार असून कर्मचार्‍यांना पीपीई कीट घालून कराव्या लागणाऱ्या रूग्णसेवेचा ताणही कमी होणार आहे. जी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या सहकार्याने हा रोबोट तयार करण्यात आला आहे. 

पोदारनंतर आता एनएससीआय केंद्रात रोबोट दाखल झाला आहे. एनएससीआय हा परिसर मोठा आहे. त्यामुळे रोबोटमध्ये एक टॅब बसवला आहे.  त्याद्वारे डॉक्टर वॉररुममध्ये बसूनच रुग्णांशी संवाद साधतील. रुग्णांना औषध, नाष्टा, जेवण, पाणी देण्यासोबत इतरही कामे तो करेल. 
- शरद उघडे,
सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण वॉर्ड

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top