Rohit Patil Took Oath As Mla : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु आहे. तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी एक आगळावेगळा योगायोग बघायला मिळाला. ज्या दिवशी आर.आर. पाटील यांची विधानसभेच्या सभागृहातून एक्झिट झाली, १० वर्षांनंतर त्याच दिवशी रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अनेकांना आर.आर. पाटील यांची आठवण झाली.