esakal | दालनांचा ताबा घेतला, मात्र खात्यांसाठी मंत्र्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'
sakal

बोलून बातमी शोधा

दालनांचा ताबा घेतला, मात्र खात्यांसाठी मंत्र्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'

दालनांचा ताबा घेतला, मात्र खात्यांसाठी मंत्र्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येवून महिना उलटला तरी सरकार अद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नाही. आघाडी सरकारमधील मंत्रयांना आज मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले असतानाच जवळपास सर्वत्र मंत्रयांनी त्याचा ताबा घेतला, मात्र अद्यापपर्यंत खात्यांचे वाटप झाले नसल्याने मंत्री वॉच ऍन्ड वॉच च्या भूमिकेत असल्याचे मंत्रालयात चित्र आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार 28 नोव्हेंबर रोजी अस्तित्वात आले. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर 30 डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. सध्या महाविकास आघाडीचे 32 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्री आहेत. या मंत्रयांना आज मंत्रालय आणि विधानभवनात दालनांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी दालनांचा ताबा घेतला. परंतू मंत्रीमंडळाचे खातेवाटप अद्याप झाले नसल्याने दालनांमध्ये मंत्री फक्‍त बसून होते.

मोठी बातमी :  संजय राऊत पुन्हा कडाडले, म्हणतायत.. 

कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा स्विकार करण्यात ते व्यस्त होते. खात्याचे वाटप नसल्याने कोणत्याही खात्याच्या फाईल्स मंत्रयांकडे सध्या येत नाहीत. त्यामुळे मंत्रयांचा प्रशासकीय कारभार अद्याप सुरूच नसल्याचे चित्र आहे. मंत्रयांचा शपथविधी झाल्यापासून मंत्री आस्थापनावर नियुक्‍ती होण्यासाठी अनेक कर्मचारी आणि अधिकारी मंत्रयांच्या मागे फिरत आहेत. परंतू खातेवाटपाशिवाय कर्मचारी नियुक्‍ती करता येत नसल्याने अधिकारी आणि कर्मचारीही वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. 

मोठी बातमी नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; तक्रार दाखल

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू आहेत. तात्पुरते खातेवाटप केलेले एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राउत यांच्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार असला तरी कायमस्वरूपी खातेवाटप होईपर्यंत त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे चित्र आहे. 

मोठी बातमी  रणवीर सिंगवर का आली भाड्याच्या घरात राहायची वेळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासूनच कामाचा धडाका लावला. आज सकाळी दादरच्या इंदूमिल येथे भेट देवून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएच्या अधिका-यांना त्यांनी कामासंदर्भात सुचना केल्या. त्यानंतर मंत्रालयात आल्यानंतर पवार यांनी वित्त विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांची बैठक घेवून राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. 

WebTitle : roles and duties are not yet allotted to ministers who recently took oath