

Railway Ticket Scam
ESakal
मुंबई : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सातत्याने कारवाईचा बडगा उगारत आहे. गेल्या पाच वर्षांत तिकीट दलालीच्या १,६७६ गुन्ह्यांची नोंद केली असून, १० कोटींहून अधिक किमतीची ई-तिकिटे आणि काऊंटरवरून काढलेली रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. या कारवाईत शेकडो टाऊट, एजंट आणि काही रेल्वे कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती मिळाली आहे.