धक्कादायक : मद्यपीला वाचवण्यासाठी जवानाने जीव गमावला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

पश्‍चिम रेल्वेमार्गावर मद्यधुंद अवस्थेत  रूळ ओलांडणाऱ्या एकाचा जीव रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवला खरा, परंतु लोकलची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मुंबई : अतिमद्यपानाचे घातक परिणाम आपण पाहत असतो. स्वतःबराेबरच आपल्या कुटुंबीयांच्या भविष्याची रांखरांगोळी होत असतानाही मद्यपी दारू सोडण्याचे नाव घेत नाही. दारूच्या अंमलाखाली असलेल्या एका मद्यपीमुळे शुक्रवारी रात्री एका जवानाला नाहक आपला जीव गमवावा लागला. पश्‍चिम रेल्वेमार्गावर मद्यधुंद अवस्थेत  रूळ ओलांडणाऱ्या एकाचा जीव त्याने वाचवला खरा, परंतु लोकलची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रामवीर सिंह गुर्जर असे जवानाचे नाव असून ते रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत होते.

हे वाचले का? : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय! जमावबंदी लागू करण्याचे दिले आदेश...

मूळ राजस्थानचे रहिवासी असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे रामवीर सिंह गुर्जर शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान बंदोबस्तावर होते. त्या वेळी एक व्यक्ती रेल्वेरूळ ओलांडत असताना चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल येत होती. सदर व्यक्ती मद्यपी असल्याने त्याला नीट उभे राहता येत नव्हते. रामवीर यांच्या ते लक्षात आले. त्यांनी मद्यपीला रुळाच्या बाजूला केले आणि त्याचे प्राण वाचवले; मात्र त्याला वाचवताना रामवीर यांचा तोल गेला आणि लोकलची धडक त्यांना बसली.

वाचायलाच हवे : हं... हनिमूनला जाताय, मग `या` गोष्टी सोबत असू द्या!

अपघातात रामवीर यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनित परब यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPF jawan lost his life to save an alcoholic, at mumbai railway station