हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या !

हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या !

मुंबई : लग्नसराईचा सिझन आलाय अशात लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'हनीमून' (Honeymoon). हनीमून हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रेम आणि फक्त प्रेम. तुमच्या पार्टनरसोबत खूप सुंदर क्षण घालवण्याची संधी हनीमूनमध्ये मिळत असते. तसंच तुमच्या पार्टनरच्या आवडी-निवडीही हनीमूनमध्ये तुम्हाला कळतात. हनीमूनमुळे तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असलेलं प्रेम अजून वाढतं. मात्र हनीमूनला जाणाऱ्या कपल्ससाठी एक गुड न्यूज आहे. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींची यादी देणार आहोत ज्यामुळे तुम्ही हनीमूनला आपल्या पार्टनरचं मन जिंकू शकता.   

नुकतंच लग्न झालेल्या दाम्पत्यांसाठी हनीमून म्हणजे एकमेकांसोबत एखाद्या नयनरम्य ठिकाणी सुंदर क्षण घालवण्याची संधी असते. नवीन लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी दोघं एकमेकांसाठी सतत काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करत असतात. हनीमूनला आपल्या पार्टनर कसं खुश ठेवता येईल याचाच विचार दोघंही करत असतात. मात्र हनीमूनला जातांना काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवणं आवश्यक आहे. या गोष्टीं सोबत ठेवल्यामुळे तुम्ही तुमचं हनीमून अधिक सुंदर आणि अविस्मरणीय बनवू शकता. त्यामुळे या गोष्टी स्वत:जवळ ठेवायला विसरू नका. 

(१) लॉन्जरी: 

हनीमूनच्या दरम्यान असे अनेक क्षण येतात जेंव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ येता. तुम्हाला तुमच्या पार्टनरशिवाय दूसरं काहीही दिसत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की हनीमूनच्या 'त्या' खास क्षणांच्या वेळी तुमच्या पतीची नजर फक्त तुमच्यावर राहावी. तुमच्या पतीचं खूप प्रेम तुम्हाला मिळावं तर आपल्या बॅगमध्ये एक लॉन्जरी ठेवायला विसरू नका.  तुमची लॉन्जरी तुमच्या पार्टनरच्या आवडीने विकत घ्या. ज्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसाल आणि तुमच्या पतीचं प्रेम कायम तुम्हाला मिळत राहील.

(२) बिकिनी 

अनेकदा अनेक कपल्स परदेशी समुद्रकिनारी हनीमूनला जाणं पसंत करतात. तुम्ही एखादा सुंदर बीच असणाऱ्या ठिकाणी हनीमूनला जाणार असाल तर सोबत बिकनी ठेवायला विसरू नका. जेंव्हा तुम्ही बिकनी घालून सुंदर आणि मनमोहक समुद्रकिनाऱ्यावर जाल तेंव्हा तुमचा पार्टनर फक्त तुमच्या सुंदरतेकडे बघत राहील. तुम्हाला पार्टनरसोबत रोमँटिक क्षण अनुभवता येतील. जर तुम्हाला तुमचं प्रेम समुद्रासारखंच अथांग ठेवायचं आहे तर स्वत:जवळ बिकनी ठेवायला विसरू नका.   

(३) स्पेशल ड्रेस: 

हनीमूनमध्ये काही क्षण असेही येतात जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून स्पेशल डिनरला जायची संधी असते. तुमचा पार्टनर तुम्हाला कँडल लाईट डिनरला घेऊन जाणार असतो. किंवा क्रुजवर रोमॅंटिक डान्स करण्यासाठी घेऊन जाणार असतो. यासाठी तुम्ही तुमच्याकडे एक खूप सुंदर आणि आकर्षक ड्रेस ठेवण्याची गरज आहे. तुमच्या पार्टनरचं प्रेम मिळवण्यासाठी हनीमूनला जाताना तुम्ही आपल्याबरोबर एक स्पेशल ड्रेस बॅगमध्ये ठेवणं आवश्यक आहे. 

(४) गर्भनिरोधक औषधं:

हनीमूनच्या वेळी असेही क्षण येतात ज्यावेळी तुम्ही दोघं सगळं भान विसरून फक्त एकमेकांचे होऊन जाता. अशावेळी आपल्या हातून काही गोष्टी अनपेक्षितपणे घडण्याची भीती असते. त्यामुळे हनीमूनला जाताना स्वत:जवळ गर्भनिरोधक औषधं ठेवायला कधीच विसरू नका. मात्र काही देशांचे हे गर्भनिरोधक वापरण्याचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे हे औषधं घेताना विचार विनिमय करूनच औषधं घ्या. स्पेशालिस्टचा सल्ला घेऊनच अशा गोळ्यांचा किंवा औषधांचा वापर करा. 

(५) स्लिपवेअर :

हनीमूनला जाताय म्हंटल्यावर तुम्ही सतत फिरत राहणार नाही. तुमच्या पार्टनरसोबत हनीमून अधिक सुंदर बनवण्यासाठी आणि हनीमूनच्या वेळी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला झोपेची गरज असणार आहे. मात्र आता तुम्ही तुमच्या बेडवर एकटे नसणार आहात तुमच्याबरोबर तुमचा पार्टनरही असणार आहे. त्यामुळे हनीमूनला जाताना झोपतानाचे वेगळे कपडे घेऊन जायला विसरू नका. तुमचे स्लिपवेअर आकर्षक असतील तरच तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रेम राहील. 

(६) बॅगपॅक:

हनीमून दरम्यान काही कपल्सना अडव्हेंचर करायलाही आवडतं त्यामुळे तुम्हालाही असं करायला आवडत असेल तर सोबत छोटी बॅग न्यायला विसरू नका. शॉपिंग केल्यानंतर विकत घेतलेलं सामान ठेवण्यासाठी सोबत एक्स्ट्रा बॅग ठेवायला विसरू नका. 

अशा काही गोष्टी हनीमूनला जाताना नेहमी सोबत ठेवा आणि तुमच्या पार्टनरला खुश ठेवा.  तुमच्या पार्टनरचं प्रेम आयुष्यभर मिळवा आणि सुखी आयुष्य जगा.  

things you must carry when you are on your honeymoon read full story         


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com