
मास्क न वापरणाऱ्या तब्बल 4 लाख 85 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही मुंबईत मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणारे नागरिक दिसत आहेत. त्यांच्यावर महापालिकेने आता गांधीगिरीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेऊन त्यांना एक मास्क देण्यात येणार आहे.
मुंबई : मास्क न वापरणाऱ्या तब्बल 4 लाख 85 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही मुंबईत मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणारे नागरिक दिसत आहेत. त्यांच्यावर महापालिकेने आता गांधीगिरीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेऊन त्यांना एक मास्क देण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यापासून मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत चार लाख 85 हजार जणांवर कारवाई झाली असून 10 कोटी 7 लाख रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिणारे नागरिक सर्रास दिसत आहेत. त्यामुळे आता 200 रुपयांचा दंड घेऊन त्यांना मास्क मोफत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेने ऑक्टोबरपासून अधिक कठोर कारवाई सुरू केली आहे. रोज 7 ते 8 हजार जणांवर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर विशेष पथकेही तयार करण्यात आली आहेत. पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. क्लिन अप मार्शलनाही दंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
मास्क लाववाच लागणार
मास्क लावला नाही म्हणून कारवाई झाली. दंडही भरला गेला. मास्क नसल्याने संबंधित व्यक्ती दंड भरून तसेच पुढे जातात. त्यामुळे आता दंड भरल्यावर त्या व्यक्तीला मास्क देण्यात येणार आहे. पालिका कर्मचाऱ्यासमोरच त्याला मास्क तोंडावर लावावा लागणार आहे.
---------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)