
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपूर शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या हिसांचाराच्या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आवारात उमटले. सत्ताधारी आमदारांकडून ‘औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी’ या मागणीसाठी तर विरोधकांकडून धार्मिक द्वेष पसरविणारे मंत्री नीतेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.