esakal | बदलापूरमध्ये बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा
sakal

बोलून बातमी शोधा

dam

बदलापूरमध्ये बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने जोर (heavy rain) पकडला आहे. त्यामुळे कोकणासह (kokan) कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागात हाहाकार उडाला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये असलेल्या बारवी धरणाचे (barvi dam) दरवाजे उघडण्यात आल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती (flood situation) गंभीर होणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. (Rumour spread in Thane district badlapur area that barvi dam doors open dmp82)

प्रत्यक्ष पाहता बारवी धरणाची ओव्हर फ्लो लेवल 72.60 मी. इतकी असून सध्या बारवी धरणाची पाण्याची पातळी 67.50 मी. इतकी आहे. त्यामुळे बारवी धरणाचा दरवाजा लगेच उघडण्याची शक्यता अजिबात नाही.

हेही वाचा: लस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरु करा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये, तसेच मुसळधार पावसात अनावश्यक बाहेर पडू असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

loading image